IPL Auction 2025 Live

Maharashtra Legislative Assembly Elections 2020: विधान परिषद निवडणुकीसाठी 'काँग्रेस कडून सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदार क्रॉस वोटिंग करणार होते', एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते असा गौप्यस्फोट भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook, File Photo)

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Assembly Elections 2020) काँग्रेसकडून (Congress)  मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते असा गौप्यस्फोट भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. सोमवारी दुपारी त्यांनी मुक्ताईनगर (Muktainagar)  येथे खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी हा मोठा धक्कादायक खुलासा केला, परंतु, मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेस कडून उभं राहण्यास नकार दिला, असे स्पष्टीकरण सुद्धा खडसे यांनी दिले. सुरुवातीला विधानसभा निवडणूक, त्यानंतर राज्यसभा निवडणूक आणि आता त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही एकनाथ खडसे यांना डावलले गेल्याने आता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत पक्षांतर होणार का अशा चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 21 मे दिवशी मुंबई मध्ये होणार; उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले की, “विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने आमची नावे टाळून नव्या लोकांना उमेदवारी दिली. राज्यसभेच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते की तुम्हाला आता नाही तर विधानपरिषदेवर संधी दिली जाईल. मात्र, आताही आमची नावे असताना आम्हाला संधी नाकारण्यात येऊन दगाफटका झाला. खरंतर याचे दुःख नाही पण पक्षात अनेक निष्ठावान असताना ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या, पक्षविरोधी कारवाया केल्या, अशा लोकांना संधी दिल्याने वाईट वाटते हा निष्ठावंतांवर अन्याय आहे."

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून यादीत प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 21 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप चार जागी तर महाविकासाघडी ही 5 जागांंसाठी  निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीकडून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संख्याबळानुसार आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.