Maharashtra Kesari 2021-22 Dates: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, येथे पाहा
त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. कोरोना काळात पूर्णपणे बंद राहिलेले कुस्त्यांचे फड पुन्हा एकदा सुरु झाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. इथे पाहा महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2021-22 Schedule ) स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक.
Maharashtra Kesari Kusti 2022 Timetable: महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींचे लक्ष हे महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2021-22) स्पर्धेकडे लागलेले असते. तालमीमध्ये घाम गाळून कमावलेले शरीर आणि वस्तादांनी शिकवलेले डाव यांचा पूरेपूर वापर करत मल्ल आपली तागत फडात दाखवतात. कुस्तीच्या फडांवर प्रेम करणाऱ्यांचीही कमी नसते. त्यामुळे कुस्त्यांचा फड म्हणजे टाळ्या, शिट्ट्या आणि उत्साह यांचा संगमच असतो. अशा या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झाली आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. कोरोना काळात पूर्णपणे बंद राहिलेले कुस्त्यांचे फड पुन्हा एकदा सुरु झाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. इथे पाहा महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2021-22 Schedule ) स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक.
मंगळवार दिनांक ०५ एप्रिल २०२२
सकाळी ०९ वा. - सर्व पंचाचे आगमन
सकाळी ९.३० ते ११ वा पर्यत - पंच उजळणी वर्ग
दुपारी १२ वाजेपर्यंत - सर्व शहर व जिल्हा संघांचे आगमन.
दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत - कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी व वजने
(५७ किलो, ७० किलो व ९२ किलो गादी व माती विभाग)
सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत - कुस्ती स्पर्धा ५७ किलो, ७० किलो व ९२ किलो गादी व माती विभाग
बुधवार दिनांक ०६ एप्रिल २०२२
सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत - अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ
(५७ किलो, ७० किलो व ९२ किलो गादी व माती विभाग )
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत - कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी व वजने
*(६१ किलो, ८६ किलो व महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग )*
सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत - कुस्ती स्पर्धा (६१ किलो, ८६ किलो व महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग )
गुरुवार दिनांक ०७ एप्रिल २०२२
सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत - अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ
(६१ किलो, ८६ किलो वजनी गट) महाराष्ट्र केसरी खुला गटातील लढती.
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत - कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी व वजने
(७४ किलो, ९७ किलो गादी व माती विभाग )
सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत - कुस्ती स्पर्धा (७४ किलो, ९७ किलो व महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग लढत )
शुक्रवार दिनांक ०८ एप्रिल २०२२
सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत - अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ
(७४ किलो, ९७ किलो वजनी गट) महाराष्ट्र केसरी खुला गटातील लढती.
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत - कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी व वजने
(६५ किलो, ७९ किलो गादी व माती विभाग )
सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत - कुस्ती स्पर्धा (६५ किलो, ७९ किलो व महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग लढत )
शनिवार दिनांक ०९ एप्रिल २०२२
सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत - अंतिम फेरी , रिपेचेस व बक्षीस वितरण समारंभ
(६५ किलो, ७९ किलो वजनी गट) व महाराष्ट्र केसरी खुला गटातील लढती.
सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत - अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ
(६५ किलो, ७९ किलो वजनी गट) व महाराष्ट्र केसरी किताब अंतिम लढत
दरम्यान, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पहिल्यादा 1961 मध्ये सुरु झाली. ही स्पर्धा सुरु झाल्यापासून या स्पर्धेची महाराष्ट्रात क्रेझ पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळात या स्पर्धेतील विजेत्याला रोख स्वरुपात रक्कम दिली जायची. मात्र, 1982 मध्ये त्यात बदल करत विजेत्याला दीड किलो चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.