Maharashtra-Karnataka Dispute: कर्नाटक राज्यातील 850 गावे महाराष्ट्रात येण्यास उत्सुक- शंभूराज देसाई
त्यामुळे ते असे दावे करत आहेत. दरमयान, शंभुराजे देसाई यांनी कर्नाटकच्याच 850 गावांची महाराष्ट्रात येण्याची इच्छा असल्याची माहिती या वेळी दिली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद (Maharashtra-Karnataka Dispute) उफाळून आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना महाराष्ट्राचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई ( Sambhuraj Desai) यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र-कर्नाटक वाद सोडवण्यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्याच्या सीमेजवळ राहणाऱ्या सीमाभागातील प्रत्येकाला पूर्ण अधिकार मिळतील.राज्य सरकारने माझी (शंभूराज देसाई) आणि चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद प्रकरणाशी संबंधीत समीतीवर नियुक्ती करण्यत आली आहे.
महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील प्रश्नासंदर्भात घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि निर्णयच कर्नाटक सरकारला खूपत आहेत. त्यामुळे ते असे दावे करत आहेत. दरमयान, शंभुराजे देसाई यांनी कर्नाटकच्याच 850 गावांची महाराष्ट्रात येण्याची इच्छा असल्याची माहिती या वेळी दिली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी (कर्नाटक-महाराष्ट्र) होणाऱ्या दावे प्रतिदाव्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra-Karnataka Border Dispute: सांगली मधील जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील करण्याचा विचार; CM Basavaraj Bommai यांच्या विधानानंतर राजकारण तापलं)
ट्विट
दरम्यान, शंभूराजे देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही या वेळी टीका केली. महाराष्ट्रातील वातावरण कोणी बिघडवत असेल तर ते संजय राऊत आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत. जेव्हापासून ते (राऊत) टीव्हीवर दिसू लागले तेव्हापासून महाराष्ट्राचे वातावरण बिघडायला लागले, असल्याचे शंभूराजे म्हणाले.
कर्नाटकच्या सीमावादासंदर्भात आमचे (महाराषट्राचे) शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे. कर्नाटक आपली कायदेशीर लढाई लढेल, आम्ही आमची लढू. महाराष्ट्राला न्याय मिळावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करु. तसेच, 85 गावांना जे हवे ते आम्ही देऊ, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रस्तावही दिला आहे. कर्नाटक सरकारने वाद निर्माण केल्याचे पाहून आम्ही या विषयावर वेगाने काम करत आहोत, असे शंभूराज देसाई म्हणाले.