Aditya Thackeray on CM Eknath Shinde: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच महाराष्ट्राचे मंत्री घाबरले, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद(Maharashtra Karnataka Border Dispute), शेतकरी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या यांवरुन युवासेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद(Maharashtra Karnataka Border Dispute), शेतकरी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या यांवरुन युवासेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांचा थेट नामोल्लेख टाळत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray on CM Eknath Shinde) यांनी एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत. राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं!, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On Basavaraj Bommai: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक- शरद पवार)
ट्विट
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वक्तव्ये आणि कन्नड रक्षक वेदिका संघटनेने बेळगावमध्ये केलेेल कृत्य यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणात आज बेळगावमध्ये जे काही झाले ते अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे रुप दिले जात आहे. बेळगावध्ये जे घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. परंतू, त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये निर्माण झालेल्या तणावात्मक परिस्थितीवर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक असल्याचेही शरद पवार (Sharad Pawar On Basavaraj Bommai) म्हणाले.