भारतामध्ये सर्वाधिक कोरोना लस देण्याच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी, डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली माहिती

महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) काल (24 मार्च) दिलेल्या अपडेट्सनुसार, राज्यात 31,855 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राबाबत एक कौतुकास्पद गोष्ट देखील घडली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाची लस (COVID-19 Vaccination) देणा-या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. ही माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी दिली आहे. तसेच 5 मिलियनपेक्षा अधिक कोरोनाचे डोस देणा-या राज्यांमध्येही महाराष्ट्र अग्रस्थानी आहे असेही डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) काल (24 मार्च) दिलेल्या अपडेट्सनुसार, राज्यात 31,855 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील एकूण संक्रमणाची संख्या 25,64,881 वर पोहोचली आहे. आज राज्यात 15098 लोक बरे झाले असून आतापर्यंत 22,62,593 लोक या आजारामधून बरे झाले आहेत. महाराष्ट्र आज 95 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या 53,684 वर पोहोचली आहे. सध्या तब्बल 2,47,299 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र त्याचबरोबर दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात कोरोना लसीकरणाचे मोहिम देखील युद्धपातळीवर सुरु असून अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे.हेदेखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आढळला कोरोना विषाणूचा E484Q आणि L452R वेरिएन्ट

बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूची सक्रिय प्रकरणे 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आहेत. हे जिल्हे- पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगळुरू अर्बन, नांदेड, जळगाव, अकोला असे आहेत. या 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील आणि एक जिल्हा कर्नाटकचा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्ये आमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे.