Maharashtra HSC, SSC Results 2020 Dates: येत्या काही दिवसांत 10वी, 12वी निकाल तारखा जाहीर होण्याची शक्यता; mahresult.nic.in वर असा पाहू शकाल निकाल

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जुलै 2020 पर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

10th, 12th Board Results Dates In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये यंदा कोरोना व्हायरस संकटाचा मोठा फटका शैक्षणिक वर्षालादेखील बसला आहे. त्यामुळेच जुलै महिना उजाडला तरीही अद्याप महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC) विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालांच्या तारखेची (Board Exams Result Date) घोषणा झालेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जुलै 2020 पर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 12वीचा निकाल (HSC Result) यंदा 15 जुलै पर्यंत तर 10 वीचा निकाल (SSC Result) यंदा जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत जाहीर केला जाणार आहे. दरवर्षी निकालाच्या अवघ्या 1-2 दिवस आधीच मंडळाची निकालाची तारीख जाहीर केली जाते. सकाळी 11 वाजता बोर्डाकडून अधिकृत निकालाची माहिती दिली जाते तर दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सोबतच बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहता येतो.

आता जसजसा जुलै महिन्याचा मध्य जवळ येत आहे तशी राज्यातील एचएससीच्या विद्यार्थ्यांच्या मनात निकालाबद्दल उत्सुकता वाढत आहे. दरम्यान यंदा कोरोना संकट पाहता देशामध्ये सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या 12वी, 10वीच्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहे. त्यांना सरासरी गुण देऊन अंतर्गत मुल्यमापनानुसार मार्क्स देऊन निकाल लावले जाणार आहे. महाराष्ट्रात बोर्डाचे 12वीचे पेपर सुरळीत झाले आहेत. मात्र 10वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने त्याचे सरासरी गुण देऊन निकाल लावले जातील.

बोर्डाचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

दरम्यान विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतात. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमधून, शाळांमधून उपलब्ध करून दिली जाते.