Maharashtra HSC Board Exam 2024: मुंबई विभागामध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचं पहिलं प्रकरण आलं समोर!

Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC Board Exam) सुरू झाल्या आहे. यामध्ये मुंबई विभागात कॉपीचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. सोमवार 26 फेब्रुवारी दिवशी Organisation of Commerce (OC) and Management and General Foundation Course चा पेपर होता. या पेपरच्या वेळेस कॉपी करताना एकाला पकडण्यात आलं आहे. दरम्यान अन्य कोणत्याही सेंटर वरून त्या दिवशी कॉपी पकडण्यात आलेली नाही. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 19 मार्च पर्यंत हे पेपर सुरू राहणार आहेत.

महाराष्ट्रभरामध्ये 12वीच्या परीक्षेत 58 कॉपीच्या केसेस आतापर्यंत राज्यात नोंदवण्यात आल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षा भयमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात तसेच कॉपीच्या प्रकरणामध्ये, पेपरफूटीच्या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे बोर्डाने आदेश दिले आहेत. नक्की वाचा: Maharashtra SSC, HSC Exam 2024 Dates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा .

एकीकडे परीक्षा पार पडत असताना दुसरीकडे बोर्डाच्या परीक्षेच्या पेपर तपासणीच्या कामावर शिक्षकांनी बंदी घातली आहे. वाढीव पेंशन आणि रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. 1298 पैकी केवळ 283 जागा भरल्या असल्याचा दावा शिक्षकांकडून करण्यात आला आहे.

बोर्डाने अद्याप परीक्षेचा पेपर फूटल्याच्या कोणताही प्रकार समोर आलेला नसल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडीयात समाजकंटकांकडून पसरवल्या जाणार्‍या खोट्यानाट्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.