Maharashtra Hospital Deaths: ठाणे, नांदेड, संभाजीनगर, नागपूर मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये जीव गेलेल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका करत चौकशीची मागणी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी असते की रूग्णालयात बळी का जात आहेत? आता याची चौकशी सीबीआय कडून व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. यावर आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील भाष्य केले आहे. राज्याच शासकीय हॉस्पिटल मध्ये कोविड काळात जे कर्मचारी, डीन, डॉक्टर होते तेच आजही काम करत आहेत मग आरोग्य यंत्रणेची ही अशी अवस्था कशी असू शकते? आता एक फूल दोन हाफ कुठे आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी असते की रूग्णालयात बळी का जात आहेत? आता याची चौकशी सीबीआय कडून व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात ड्रोनने सुद्धा औषध पुरवठा केला गेला होता. कोविड मध्ये लसीकरण झालं, औषधांचा पुरवठा व्यवस्थित झाला. योध्यासारखे हे सगळे लढले त्या आरोग्य यंत्रणेला बदनाम केलं जाताय याला जबाबदार कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
सरकारला गोवा, गुवाहाटी, सुरतला फिरायला पैसे आहेत पण आरोग्य यंत्रणेसाठी पैसे नाहीत. फक्त नांदेडच्या डीनवरच गुन्हा का दाखल केला? कळवा, संभाजीनगरला तेच झालं तिथे गुन्हा दाखल का झाला नाही ? हा सवाल देखील विचारला आहे. Nagpur मध्ये मेयो-मेडिकल रूग्णलयांमध्ये 24 तासांत दगावले 25 रूग्ण; नांदेड, औरंगाबाद नंतर राज्याच्या उपराजधानीतही स्थिती चिंताजनक.
साथ नसताना मनुष्यबळ कसा कमी पडत . डॉक्टरांच्या बद्दलयासाठी पदासाठी रेट कार्ड ठरलाय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शासकीय रूग्णालयांमध्ये जाऊन डीन सोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)