Maharashtra Health Department Recruitment 2021: महाराष्ट्रात आरोग्य विभागात नोकर भरती, 3466 पदांसाठी केली जाणार योग्य उमेदवारांची निवड

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-ड पदाच्या एकूण 3466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Maharashtra  Health Department  Recruitment 2021: सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-ड पदाच्या एकूण 3466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

नोकरीचे ठिकाण हे ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे येथेअसणार आहे. नोकर भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

>पदाचे नाव – गट-ड

>>पद संख्या – 3466

>>शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

>>अर्ज पद्धती – ऑनलाईन

>>अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021

>>अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-क पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021आहे.