Maharashtra Govt's 100-Day Report Card: सरकारच्या 48 विभागांपैकी 12 विभागांनी केली आपली 100% उद्दिष्ट पूर्तता; महिला व बाल विकास मंत्रालय सर्वोत्तम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. य
महाराष्ट्र सरकारच्या 48 विभागांपैकी बारा विभागांनी त्यांच्या 100 दिवसांच्या अहवाल कार्डमध्ये, आपले 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम आखला होता आणि त्यात महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली होती. ज्या विभागांचे लक्ष्य 100 टक्के पूर्ण झाले आहे त्यात जलसंपदा, गृह, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन, बंदरे, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, कामगार, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक व्यवहार, खाणकाम, दुग्धविकास आणि रोजगार हमी योजना यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, ‘ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.’ (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभासाठी जन्मतारखेत बदल, वेगवेगळी आधार कार्ड; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार)
Maharashtra Govt's 100-Day Report Card:
शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. यामध्ये चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)