IPL Auction 2025 Live

COVID 19 Restrictions In Maharashtra: राज्य सरकार कडून Beauty Salons, Gyms यांच्यावरील निर्बंध शिथील; 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली 10 जानेवारी, सोमवार पासून लागू असणार आहे.

Gym (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र सरकारने काल (8 जानेवारी) राज्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध कडक करण्याचे आदेश दिले होते. पण त्यामधील काही निर्बंधांवर आक्षेप घेत सरकारशी बोलणी करत त्यामधून शिथिलता मिळवण्यात ब्युटी सलून (Beauty Salons) आणि जीम (Gym) व्यावसायिकांना यश मिळालं आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार ब्युटी सलून आणि जीम आता 50% क्षमतेने सुरू ठेवली जाऊ शकते. हेअर कटिंग सलून रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद ठेवण्याचे आदेश  आहेत.

आज सरकारसोबत जीम आणि ब्युटी सलून व्यावसायिकांची झालेली चर्चा पाहता कालच्या नियमावलीमध्ये बदल झाला आहे. काल जीम पुन्हा पूर्ण बंद ठेवली जाणार असे आदेश होते पण आता नव्या नियमावलीनुसार, ब्युटी सलूनचा समावेश हेअर कटिंग सलून मध्ये त्यांना 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर जीम देखील 50% क्षमतेने सुरू राहील. यामध्ये केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी असेल असे मात्र नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली 10  जानेवारी, सोमवार पासून लागू असणार आहे. CM Appeals Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा राज्यातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन.

CMO Maharashtra Tweet

महाराष्ट्रात सोमवार पासून शाळा कॉलेज, महाविद्यालयं 15 फेब्रुवारी पर्यंत बंद आहे. पर्यटनस्थळं, मैदानं, स्विमिंग पूल बंदा राहणार आहेत तर खाजगी कार्यालयं, सिनेमा हॉल, नाट्यगृहं 50% क्षमतेने सुरू ठेवली जाणार आहेत. इथे पहा सविस्तर नियमावली.

दरम्यान काल महाराष्ट्रामध्ये 41,434 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे तर केवळ मुंबई मध्येच 20,318 रूग्ण दिवसभरात समोर आले आहेत. सध्या ओमिक्रॉनची वाढती दहशत, कोरोना रूग्णांची संख्या आरोग्य प्रशासनासमोरील नवं आव्हान आहे.