कोविड-19 संकटात Remdesivir चा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने खरेदी केल्या औषधाच्या 60,000 बाटल्या

त्यामुळे Remdesivir च्या काळा बाजाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 60,000 औषधांच्या बाटल्या मागवल्या आहेत.

Remdesivir (Photo Credits: ANI)

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना Remdesivir या कोविड-19 (COVID-19) वरील औषधाचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे Remdesivir च्या काळा बाजाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 60,000 औषधांच्या बाटल्या मागवल्या आहेत. या औषधाच्या एका बाटलीसाठी तब्बल 3,392.48 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशांनंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (Directorate of Medical Education and Research) याची ऑर्डर दिली आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, डीएमआरसी ने 30,870 रुपयांचे टोसिलीज़ुमाबच्या 20,000 बाटल्या आणि फेविपिरविर (Favipiravir) च्या 6 लाख टॅबलेट 58 रुपये प्रति टॅबलेट किंवा 1999.20 रुपयांत पूर्ण स्ट्रिप अशी ऑर्डर दिली आहे. यासंदर्भात डीएमआयचे प्रमुख डॉ. टीपी लहाने यांनी सांगितले, "आम्ही पुढील 6 महिन्यांसाठी याची बुकींग करत आहोत आणि या किंमती एका वर्षासाठी व्हॅलिड असतील. यामुळे काळाबाजार समाप्त होईल आणि लोकांना स्वस्त दरात ही औषधं उपलब्ध होतील."

सुमारे 20 कोटी रुपयांची औषधं राज्यातील कोविड-19 रुग्णालयांना देण्यात येतील. त्याचबरोबर राज्यातील सरकारी आणि खाजगी कोविड-19 हॉस्पिटल्सने राज्य सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीत औषधांची खरेदी करावी असे आदेश यापूर्वीच काढण्यात आले आहेत, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. (धक्कादायक! कोरोना व्हायरस औषध Remdesivir चा काळा बाजार; 30,000 ते 40,000 हजार प्रती कुपी दराने होत आहे विक्री- Report)

यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकार सर्वांना Remdesivir आणि Favipiravir औषधं पुरवले असे सांगितले होते. "ही दोन्ही औषधे येत्या काही दिवसांत सर्व जिल्ह्यातील लोकांसाठी उपलब्ध होतील. ही औषधे केवळ श्रीमंतांसाठीच नाही तर सर्वांना मिळतील याकडे आमचे लक्ष राहील," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.