महाराष्ट्र: शासनाने थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करावा अशी अमोल कोल्हे यांची सरकारला विनंती
महापुरुषांच्या यादीत सुधारणा करण्यात यावी असे ही कोल्हे यांनी म्हटले आहे.
शासनाने थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा उल्लेख करण्यात यावा अशी राष्ट्रावादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सरकारला विनंती केली आहे. महापुरुषांच्या यादीत सुधारणा करण्यात यावी असे ही कोल्हे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. तर राज्य सरकारने तयार केलेल्या थोर महापुरुषांच्या यादीत संभाजी महाराज यांचा उल्लेख नसल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. कोल्हे यांनी टीव्ही मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भुमिका साकारल्याचे दिसून आले आहे. परंतु संभाजी महाराज यांचा उल्लेख थोर महापुरुषांच्या यादीत न करण्यात आल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.
आज संभाजी महारांचा तारखेनुसार जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र, स्वराज्याचे पहिले युवराज आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा आज जन्मदिवस आहे. शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सर्व सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली. 16 जानेवारी इ.स. 1681 रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला. संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला.(Sambhaji Maharaj Jayanti 2020 Wishes: संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा मराठी संदेश, SMS, Messages, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp द्वारा शेअर करून साजरा करा छत्रपती शंभुराजेंचा जन्मसोहळा!)
तर संभाजी महाराज यांना मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवरायांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत नेले होते. शिवरायांचा हा दूरदृष्टी विचार खरंच वास्तवात आला. रणभूमीवर संभाजी महाराजांनी एकही युद्ध हरले नाहीत. दरवर्षी शिवप्रेमी शंभूराजेंच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात पण यंदा कोरोना संकटाच्या सावटामुळे महाराष्ट्रभरात हा उत्सव छोट्या स्वरूपात साजरा केला जाणार आहे.