महाराष्ट्रातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित, येथे पाहा यादी
ही संख्या खूपच धक्कादायक म्हणून योग्य ते उपाययोजना सरकार कडून करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील 30 सरकारी रुग्णालये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित करण्यात आली आहेत.
COVID-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 सरकारी रुग्णालये ही कोरोना ग्रस्तांसाठी असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला असून वैद्यकीय यंत्रणा कुठेही कमी पडू नये यासाठी राज्यातील 30 सरकारी रुग्णालयांना कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित करण्यात आले आहे. या 30 रुग्णालयांत एकूण 2305 बेड्स कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हा खूपच चांगला निर्णय असून या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 416 वर जाऊन पोहोचला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक म्हणून योग्य ते उपाययोजना सरकार कडून करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील 30 सरकारी रुग्णालये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित करण्यात आली आहेत.
पाहा कोणती आहेत ही सरकारी रुग्णालये
ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी. बी बिल्डींग
मीरा भाईंदर- पंडित भीमसेन जोशी रुग्णालय
वाशी - सामान्य रुग्णालय
कल्याण-डोबिवली महानगरपालिका- शास्त्री नगर दवाखाना
रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय
नाशिक- कुंभमेळा बिल्डिंग व महानगरपालिका कठडा हॉस्पिटल अनुक्रमे
अहमदनगर- जिल्हा रुग्णालय
नंदुरबार- डोळ्यांचा दवाखाना
धुळे- जिल्हा रुग्णालय, शहारातील इमारत
पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध
सातारा- सामान्य रुग्णालय
सिंधुदुर्ग- नवीन इमारत एएमपी फंडेड
रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोली उपजिल्हा रुग्णालय
औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय
हिंगोली- जिल्हा रुग्णालय
हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय
लातूर- उदगिर उपजिल्हा रुग्णालय
उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत
उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डिंग
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत
नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने
मुखेड उपजिल्हा रुग्णालय
अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत
वाशिम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत
बुलढाणा- स्त्री रुग्णालय नवीन इमारत
वर्धा- सामान्य रुग्णालय
भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नवीन इमारत
गडचिरोली- जिल्हा रुग्णालय Coronavirus: कोरोना व्हायरस रुग्णांचा राज्यातील आकडा 81 ने वाढला; एकट्या मुंबई शहरात 57 जणांची नोंद, 42 जणांना डिस्चार्ज
या 30 रुग्णालयात 2305 बेड्सचा समावेश आहे, असे राज्य आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा धोका अधिक वाढला आहे. काल (1 एप्रिल 2020) 335 इतका असलेला आकडा आज (2 एप्रिल 2020) 416 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोना बाधित रुग्णांच आकडा 81 ने वाढला आहे. एकट्या मुंबई शहरातच 57 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, दिलासादायक वृत्त असे की रुग्णलयात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 42 जणांना प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.