Maharashtra Government Formation: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री कोण?

आधी अजित पवार यांचं नाव उपमुख्यमनातरी पदासाठी चर्चेत होतं.

Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

Deputy CM Of Maharashtra: देवेंद्र फडणवीस यांनी काल तब्बल 80 तासांच्या कालावधीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला. आणि संध्याकाळी लगेचच महाराष्ट्र विकास आघाडीने अखेर स्थिर सरकार स्थापन करण्याची माध्यमांसमोर अधिकृत घोषणा केली. या बैठकीला उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते असणार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही होणार अशी घोषणा करण्यात आली.

परंतु अद्याप उपमुख्यमंत्री कोण हे सांगण्यात आलेलं नसलं तर आता थोड्याच वेळात ते जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी अजित पवार यांचं नाव उपमुख्यमनातरी पदासाठी चर्चेत होतं. परंतु त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी केल्यामुळे त्यांचं नाव आता उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे.

आता मात्र उपमुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार यावर दोन नावं पुढे येत आहेत. जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन्ही बड्या नेत्यांची नावं सध्या चर्चेत पाहायला मिळत आहेत. पण अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

Maharashtra Government Formation Live News Updates: मंत्रीमंडळाचा निर्णय जो पक्ष घेईल तो मान्य असेल: अजित पवार

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आधी 1 डिसेंबर रोजी होणार असे ठरले होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला असून 28 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या शिवतीर्थावर संध्याकाळी 6.40 मिनिटांनी शपथविधीचा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.