अभिनंदनाच्या भाषणातून आपल्यावर टोलेबाजी करणा-या सत्ताधा-यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका शायरी मधून कडक शब्दांत उत्तर दिले. 'मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो मात्र मी टाईमटेबल सांगितलं नव्हतं' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना मैं समंदर हूं फिर लौटकर वापस आऊंगा' या शायरीमधून त्यांनी सत्ताधा-यांना इशारा दिला.
Maharashtra Government Formation: अभिनंदनाच्या भाषणातून टोलेबाजी करणा-या सत्ताधा-यांना देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीमधून दिले उत्तर
आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. आज सकाळी 11.00 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होईल.
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर शनिवारी त्यांच्या नव्या सरकारसाठी कालचा दिवस फार निर्णायक होता. कारण या नवीन सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते. विरोधकांच्या गदारोळानंतर आणि सभात्यागानंतर विधानभवनाता एक ऐतिहासिक विश्वासदर्शक ठराव झाला. ठाकरे सरकारला 169 आमदारांचे समर्थन मिळून त्यांना आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध केले. ठरावाप्रसंगी एमआयएमचे दोन तसेच मनसे व माकपच्या प्रत्येकी एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. तर भाजपन सभागृहातून सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठराव प्रस्तावाच्या विरोधात शून्य मते पडली. याचाच पुढचा भाग म्हणून आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक (Vidhan Sabha Speaker Election) होणार आहे. आज सकाळी 11.00 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होईल.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते. त्यानुसार शनिवारी सभागृहाचे काम सुरू होताच हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. कामकाज सुरू होताच विधिमंडळाचे भाजप गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडत मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांचा शपथविधी, हंगामी अध्यक्ष बदलणे हे नियमबाह्य असल्याचा आक्षेप नोंदवला. Maharashtra Government Formation: उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती 22 डिसेंबरला होणार; प्रफुल्ल पटेल यांची माहिती
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसह आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यातील अनेक दिग्गज नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. त्यामुळे आजच्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)