उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला बंधू राज ठाकरे राहणार उपस्थित? 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्क वर रंगणार सोहळा
यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचेदेखील नाव असण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या (28 नोव्हेंबर) शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या सोहळ्याला उद्धव ठाकरे त्यांच्यामधील मतभेद बाजूला ठेवत राज ठाकरेंना आमंत्रण देणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. आज विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मीडीयाशी बोलताना त्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या महाराष्ट्रासह देशातील दिग्गज मंडळी शपथविधीला पोहचणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचेदेखील नाव आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या 'मातोश्री' ते 'वर्षा'पर्यंतचा त्यांचा प्रवास.
महाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस या महाआघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज एकदिवसीय विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. काल महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यानंतर प्रशासन आणि पोलिस व्यवस्था चोख करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीला ठाकरे कुटुंबीयाची उपस्थिती पहायला मिळणार का? याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण ते मातोश्रीवर गेले होते. तर उद्धव ठाकरे देखील अमित ठाकरेंच्या लग्नाला उपस्थित होते. आता उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थिती लावणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आजारपणात ते आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेत राज ठाकरेंनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मदत केली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून जेव्हा आदित्य निवडणूकीला सामोरे जात होता तेव्हा मनसेने त्याच्याविरूद्ध उमेदवार देणं टाळलं होतं.