Maharashtra Government Formation Live Update: शिवसेनेच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला सुरुवात

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अखेर शनिवारी सुटल्यानंतर राष्ट्रपती राजवट काढून टाकण्यात आली. तसेच राजभवनात सकाळी पार पडलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. राजकरणात कधी नव्हे झाले ते शुक्रवारी भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये दिसून आले.

25 Nov, 04:49 (IST)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हॉलेल 'ललित' येथून बाहेर पडले असून, ते निवासस्थान 'मातोश्री'कडे रवाना झाले आहेत. हॉटेल ललित येथे शिवसेनेचे सर्व आमदार आहेत. उद्धव ठाकरे हे दिवसभर आमदारांसोबत आहेत.

25 Nov, 04:07 (IST)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असेलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर एक बैठक सुरु असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरु असल्याचे समजते.

25 Nov, 03:30 (IST)

राजकीय बंडानंतर दिवसभर घरात थांबलेले अजित पवार हे अखेर काही वेळापूर्वीच घरातून बाहेर पडले आहेत. ते कुठे जाणार याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस मिळाल्याने ते ज्येष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी घराबाहेर निघाल्याचे सांगितले जात आहे.

25 Nov, 01:33 (IST)

गेले दोन दिवस चर्चा आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबतच आहे. कोणीही अफवा पसरवू नयेत असे अवाहन ट्विटद्वारे धनंजय मुंडे यांनी केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या भूमिकेनंतर धनंजय मुंडे जोरदार चर्चेत आले होते. या सर्व चर्चेनंतर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच ट्विट करुन भूमिका मांडली आहे.

धनंजय मुंडे ट्विट

25 Nov, 24:40 (IST)

'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील' असं ट्विट अजित पवार यांनी केले. या ट्विटनंतर शरद पवार यांनीही ट्विट करत अजित पवार हे दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार ट्विट

भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. @NCPspeaks ने @ShivSena व @INCMaharashtra यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. @AjitPawarSpeaks यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 24, 2019

अजित पवार ट्विट

25 Nov, 24:40 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांच्या बैठकीस पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. दोघांनीही आमदारांना मार्गदर्शन केले. आपल्याकडे बहुमत आहे. सभागृहात आपण हे बहुमत सिद्ध करु शकतो, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

25 Nov, 24:39 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार ज्या रेनसॉ हॉटेलवर आहेत तिथे साध्या वेशातील पोलीस संशायस्पदरित्या उपस्थित असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाब विचारत चौकशी केली.

25 Nov, 24:39 (IST)

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरु करण्यात आल्याचे वृत्त आहे. राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आले आहेत.

24 Nov, 22:08 (IST)

-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेनेसाँ येथील काँग्रेस पक्षाच्या आमदारांना भेटून झाल्यानंतर ललित हॉटेलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.
-राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना ठाणे येथे हलवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

24 Nov, 22:01 (IST)

महाशिवआघाडीचे सरकार राज्यात येणार असल्याचे आमदारांना आश्वासन शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  दिले आहे. तसेच उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे महाशिवआघाडीचे लक्ष लागून राहिले आहे.

24 Nov, 21:51 (IST)

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता अजित पवार यांनी यावर मोदी यांचे आभार मानल्याचे ट्वीट केले  आहे. तसेच ज्या नेतेमंडळींनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे सुद्धा आभार ट्वीटरच्या माध्यमातून मानले आहेत.

24 Nov, 21:31 (IST)

धननंजय मुंडे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची स्वतंत्र चर्चा करण्यात आली आहे, कारण सत्ता स्थापनेपूर्वी मुंडे यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे दिसून आले होते. परंतु धननंजय मुंडे यांच्या भुमिकेबाबत कुठेतरी संभ्रम असल्याचे दोन्ही पक्षांना वाटत आहे.

24 Nov, 21:18 (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. तर कोणत्याही क्षणी  भाजपच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पियुश गोयल यांची उपस्थिती लावली आहे.

24 Nov, 21:00 (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर वसंतस्मृती येथे पार पडणाऱ्या आमदारांच्या बैठकीत पक्षाची पुढील रणनिती काय असणार हे ठरवले जाणार आहेत. तसेच बहुमताचा आकडा पार करण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार या मुद्द्यावर सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे.

24 Nov, 20:45 (IST)

उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसेनेच्या आमदारांची ललित हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत. तर नुकतीच रेनेसाँ येथील बैठक संपवून उद्धव ठाकरे आता प्रथम काँग्रेसच्या आमदारांना भेटण्यासाठी जाणार असून त्यानंतर पक्षाच्या आमदारांंना भेटणार आहेत.

24 Nov, 20:39 (IST)

काँग्रेस पक्षाच्या आमदरांचा आज मुक्काम मुंबईतच असणार आहे. तर उद्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर महाशिवआघआडी काय निर्णय घेणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

24 Nov, 20:20 (IST)

भाजप पक्षाला पाठिंबा देण्याच्या चर्चा काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्याबाबत सुरु होत्या. तर सत्ता स्थापनेनंतर आता बच्चू कडू यांनी शिवसेनेत राहणार असल्याचे मोठे विधान केले आहे.

24 Nov, 20:16 (IST)

थोड्याच वेळात भाजप आमदरांची बैठक मुंबईतील वसंतस्मृती येथे पार पडणार आहे. सत्ता स्थापनेनंतर नेते आमदारांची संवाद साधणार आहेत.

24 Nov, 20:12 (IST)

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. तसेच या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

24 Nov, 20:06 (IST)

आदित्य ठाकरे रेनेसाँ हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी येथे उपस्थिती लावली आहे. त्यामुळे रेनेसाँ येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडण्याची शक्यता आहे.

Read more

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अखेर शनिवारी सुटल्यानंतर राष्ट्रपती राजवट काढून टाकण्यात आली. तसेच राजभवनात सकाळी पार पडलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. राजकरणात कधी नव्हे झाले ते शुक्रवारी भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये दिसून आले. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी आपला पाठिंबा दर्शवला. यामुळे पवार  कुटुंबात उभी फूट पडली असल्याचे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चांगलेच सोशल मीडियात व्हायरल झाले. एवढेच नाही शरद पवार यांना सुद्धा हा मोठा धक्का बसला असून आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भुकंप असल्याचे ही चर्चा सुरु झाली. दुसऱ्या बाजूला शुक्रवारी पर्यंत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झालेच पण शनिवारी राजकरणाची समीकरणे बददली दिसली. यामुळे एकंदर शिवसेनेला सुद्धा हा एक मोठा धक्का बसला आहे. तसेच शनिवार दिवसभर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्या पत्रकार परिषद सुद्धा सत्ता स्थापनेबाबत पार पडल्या. पण आता भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर कला असा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी लावला. तसेच या महाआघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now