Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र राज्य सरकार कडून लोकसभा निवडणुक मतदान दिवशी सुट्टी जाहीर; पहा कोणा कोणाला लागू असेल सुट्टी

महाराष्ट्रात 11, 18, 23, 29 एप्रिल दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019 Holiday List In Maharashtra: लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम सध्या जोरात सुरु आहे. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल दिवशी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदा मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे याकरिता राज्य सरकारने मतदानादिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या बाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 11, 18, 23, 29 एप्रिल दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Lok Sabha Elections 2019 या निवडणुकीत मतदार यादीत नाव, पत्ता नोंदवण्यासाठी 1950 या हेल्पलाईन नंबरची मदत कशी घ्याल?

कोणाकोणाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे?

महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये मतदान

  1. 11 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान)

    वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ - वाशिम

  2. 18 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान)

    बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर, सोलापूर

  3. 23 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान)

    जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

  4. 29 एप्रिल 2019 (महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान)

    नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी

महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये तुमच्या मतदान क्षेत्रात यंदा मतदानाचा हक्क नक्की बजावा. लोकशाहीला अधिक सक्षम करण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे. मग यंदा सुट्टीचा वापर इतर गोष्टींसाठी करण्यापेक्षा मतदानासाठी करा. तसेच यंदा मतदानादिवशी आणि मतमोजणी दिवशी 'ड्राय डे' जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची खबरदारी घेऊन तुम्ही सुट्टीला जोडून इतर प्लॅन्स बनवा.