Coronavirus Scare: खाजगी कंपन्यांनी Lock Down च्या काळात काम करू न शकलेल्या कर्मचार्यांचे पगार रोखू नयेत; सरकारचे मालकांंना आवाहन
मात्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना कोणत्याही पब्लिक किंवा खाजगी कंपनीने त्यांच्या कर्मचार्यांचे वेतन कापू नये किंवा नोकरीवर गदा आणू नये असे आवाहन मालकांना करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना गर्दी टाळण्याचं आवाहन करताना अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही आस्थपनं खुली ठेवली जाऊ शकत नाहीत असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यामुळे अनेक नोकरदारांच्या नोकरीवर गदा आली आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना कोणत्याही पब्लिक किंवा खाजगी कंपनीने त्यांच्या कर्मचार्यांचे वेतन कापू नये किंवा नोकरीवर गदा आणू नये असे आवाहन मालकांना काल केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत पूर्वीच मालकांना आवाहन केले होते. दरम्यान 31 मार्च पर्यंत लॉकडाऊनची स्थिती महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये आहे. त्यामुळे दिवसा रोजंदारीवर पोट असणार्या अनेकांनी आपल्या मूळगावी जाण्याचा मार्ग निवडला आहे. अशामध्येच मुंबई, पुणे शहराच्या रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे विनाकरक गर्दीतून अफवा आणि आजाराची भीती, संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेता मालकांनी आणि नागरिकांनीही माणूसकी दाखवावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी परतण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी.
चीनमधून जगभर पसरलेला कोरोना व्हायरस भारतामध्ये पोहचला आहे. या जीवघेण्या आजाराचे सर्वाधिक रूग्ण देशात महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता उपाययोजना करण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत. नोकरदारांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्यांनीच घराबाहेर पडावं असं सांगण्यात आलं आहे. मात्र यामध्ये ज्या नोकरदारांना कंपनी बंद असल्याने काम करणं शक्य नसल्याने खाण्यापिण्याची गैरसोय होत असेल त्यांच्यासाठी प्रशासन विशेष सोय करत असल्याचंही यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. CM Uddhav Thackeray on Coronavirus: मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
उद्या 22 मार्च दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आयोजन केलं आहे. यामध्ये नागरिकांना सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घरीच राहण्याचं आवाहन केले आहे. तर संध्याकाळी 5 वाजता एकत्र जमून डॉक्टर, नर्स सह सार्या सरकारी यंत्रणेच्या अथक मेहनतीला सलाम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.