Maharashtra Ganesh Laxmi Holi Lottery Result 2021: महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरीचा निकाल जाहीर; पहा विजेत्यांची यादी

तर दुसरं सामायिक बक्षीस 5 लाखांचे आहे.

Maharashtra Lottery | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Ganesh Laxmi Holi Lottery 2021 Result : महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी चं तिकीट काढलेल्यांसाठी आज (26 मार्च) चा शुक्रवार खास आहे. आज तुमच्या या लॉटरीच्या तिकीटाच्या निकालाचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून गणेश लक्ष्मी लॉटरी स्किम सुरू करण्यात आली आहे आणि आज त्यामधील होळी विशेष लॉटरीचा निकाल (Maharashtra Ganesh Laxmi Holi Monthly Draw) जाहीर झाला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांतच होळी आणि धुलिवंदनाचा सण राज्यभर साजरा केला जाणार आहे पण यावर्षी होळीच्या सणावरही कोरोनाचं संकट आहे पण या लॉटरीच्या जॅकपॉट रक्कमेमधून तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद येवो हीच आमची सदिच्छा. पण आता या लॉटरीच्या तिकीटामधील भाग्यवान विजेत्यांची यादी कधी, कुठे पहायची असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर त्याची सारी उत्तरं मिळवण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा.

महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी 2021 निकाल

लॉटरीचं नाव - महाराष्ट्र राज्य लॉटरी

स्कीमचं नाव - महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी

ड्रॉ ची तारीख - 26 मार्च 2021

ड्रॉ ची वेळ - संध्याकाळी 4च्या पुढे

महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी निकाल पहा विजेत्यांची यादी इथे

अधिकृत संकेतस्थळ - lottery.maharashtra.gov.in

(नक्की वाचा: Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य 'डियर लॉटरी' ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी).

दरम्यान महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी तिकीटाची किंमत 100 रूपये आहे. अवघ्या 4 अंकांवरून भाग्यवान विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये पहिलं सामायिक बक्षिस 22 लाखांचं आहे. तर दुसरं सामायिक बक्षीस 5 लाखांचे आहे. तुम्ही अधिकृत लॉटरी केंद्रांवर किंवा लॉटरीचा निकाल अधिकृत गॅझेट मधून प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन देखील पाहू शकता.