New Traffic Rules & Fines: वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यापासून हेल्मेट, सीटबेल्ट न लावल्यास 1 हजार रुपयांचा दंड

कारण पुढील आठवड्यापासून तुम्ही सीटबेल्ट किंवा हेल्मेट घातले नसल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

New Traffic Rules & Fines: वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी असून आता जर नियम मोडण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण पुढील आठवड्यापासून तुम्ही सीटबेल्ट किंवा हेल्मेट घातले नसल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालकांना चाप बसावा म्हणून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर राज्य सरकारने शुक्रवारी असे म्हटले की, नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे Motor Vehicle Amendment Act,2019 नुसार कारवाई केली जाणार आहे.

तसेच दारु पिऊन वाहन चालवल्यास चालकाला कोर्टाला सामोरे जावे लागेल असे सुत्रांनी म्हटले आहे. तर नव्या एमव्ही अॅक्ट नुसार, पहिल्यांदा पकडले गेल्यास कमीत कमी 6 महिने तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मात्र दुसऱ्या वेळेस 2 वर्ष तुरुंगवास किंवा 15 हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.(Pune Fraud: बनावट धनादेश वापरून पुण्यातील महाविद्यालयाच्या खात्यातून 25 लाख काढले, अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल)

राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी टाईम्स ऑफ इंडियाला म्हटले की, आम्ही काही दंडात कपात करणार आहोत. त्याचसोबत राज्य सरकारकडून दंडाच्या रक्कमेबद्दल सुधार करण्यात येणार आहे. जेणेकरुन रस्ते अपघात किंवा नियमांचे पालन केले जाईल. जेव्हा भाजप-शिवसेना यांचे सरकार राज्यात होते त्यावेळी सुद्धा परिवहन विभाग हे सेनेकडेच होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुमच्या वाहनांची नंबर प्लेट ही फॅन्सी असल्यास 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्याचसोबत हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वेगाने गाडी चालवणे आणि परवान्याशिवाय वाहन चालवल्यास हजारांपर्यंत दंड स्विकारला जाणार आहे. या व्यतिरिक्त भरधाव वेगाने कार चालवणे आणि अतिप्रमाणात सामान वाहून नेत असल्यास 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. या दंडासंदर्भात अधिकृत नोटीस सोमवारी समोर येणार आहे. त्यानंतरच दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे.