पुणेकरांची चिंता वाढली; कोरोनामुळे एका दिवसात 5 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत एकूण 73 लोकांचा बळी
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. यातच कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात (Pune) आज आणखी 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 73 जणांनी आपला जीव गमवला आहे.
देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. यातच कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात (Pune) आज आणखी 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 73 जणांनी आपला जीव गमवला आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता महाराष्ट्रातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.
पुण्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या आकड्यात वाढू नये म्हणून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. सध्या शहरातील विशेषतः पेठांमधील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी केल्या जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यानेच रुग्णांचा मोठा आकडा समोर येत आहे. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबईतून सांगलीत आणलेल्या तरुणीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
एएनआयचे ट्वीट-
पुण्यात कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे पुणेकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात पुढच्या 3 दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 500 तर, 15 मेपर्यंत 3 हजार वर जाण्याची शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी वर्तवली होती. त्यामुळे लॉकडाऊनचे पालन तंतोतंत पद्धतीने करण्याचे आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.