वसई मधील ख्रिस्ती जोडप्याने जपली कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी; लग्नाच्या दिवशी क्वारंटीन सेंटरला दान केले 50 बेड्स

वसई (Vasai) मधील एरिक (Eric) आणि मर्लिन (Merlin) या जोडप्याने उदारता दाखवत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांनी 50 बेड्स मुंबई कोविड सेंटरच्या क्वारंटीन सेंटरला (Quarantine Centre) दान केले आहेत.

Eric & Merlin। Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये कोरोनाचे वाढते रूग्ण नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत असली तरीही अशा कठीण काळातही अनेक हात मुंबईकरांच्या मदतीला पुढे आले आहेत. वसई (Vasai) मधील एरिक (Eric) आणि मर्लिन (Merlin) या जोडप्याने अशीच उदारता दाखवली आहे. त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांनी 50 बेड्स मुंबई कोविड सेंटरच्या क्वारंटीन सेंटरला (Quarantine Centre) दान केले आहेत. सध्या महाराष्ट्रात वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहता लग्नसोहळांवरही बंधनं आली आहे. कमाल 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास परवानगी नाही. अशा स्थितीत लग्न करताना या खिस्ती धर्मीय जोडप्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तसेच मुंबई हे दाटीवाटीचे शहर असल्याने अनेक ठिकाणी लोकांना घरीच सोशल डिस्टन्सिंग पाळा, होम क्वारंटीन रहा असा सल्ला देणं शक्य नाही त्यामुळे पालिका प्रशासन, राज्य सरकार यांनी एकत्रित मिळून अनेक ठिकाणी क्वारंटीन सेंटर्स उभारली आहे. येथे नागरिकांना किमान 14 दिवस ठेवले जाते. सध्या क्वारंटीन सेंटर्समुळे लोकांना विलगीकरणात ठेवून कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अशा सेंटर्सला जनसामान्यांमधूनही मदतीचा ओघ वाढला आहे. मुंबई: शहनवाझ हुसेन, अब्बास रिझवी शहरात कोरोना रूग्णांना उपलब्ध करतात मोफत ऑक्सिजन सिलेंडर्स; 'हे' कारण ठरली प्रेरणा!

ANI Tweet  

दरम्यान मुंबईमध्ये काल आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 846 नवे रूग्ण मुंबई शहरात आढळले आहेत. 30,063 रूग्णांवर सध्या मुंबईत उपचार सुरू असून लवकरात लवकर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी मुंबईपालिका प्रशासनाकडून देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नुकताच त्यासाठी 'मिशन झिरो' हा प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. सध्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांच्या उत्तर दिशेला म्हणजेच दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंड, भांडूप या भागात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.