Maharashtra Election Winner List 2019: आदित्य ठाकरे, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस सह हे 288 आमदार करणार विधानसभेत जनतेचं नेतृत्त्व
मग पहा तुमच्या मतदारसंघात तुम्ही केलेले मत दिलेला उमेदवार निवडून आला आहे का?
Maharashtra Election Results 2019 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये अनेक निकाल अनपेक्षित लागले आहेत. 21 ऑक्टोबर दिवशी 288 विधानसभा जागांवर झालेल्या मतदानामध्ये राज्यात सुमारे 60% मतदान झाले. या मतदानाचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला तर दुसरीकडे शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार (Rohit Pawar) विधानसभेवर पहिल्याच निवडणूकीत आमदार झाले आहे. मग पहा तुमच्या मतदारसंघात तुम्ही केलेले मत दिलेला उमेदवार निवडून आला आहे का? हे तपासून पाहण्यासठी खाली यादी तपासून पहा. यामध्ये महाराष्ट्रातील 288 आमदारांची संपूर्ण यादी तुम्हांला एका क्लिकवर पाहता येणार आहे. आमचं ठरलयं! भावी मुख्यमंत्री महायुतीचाच होणार देवेंद्र फडणवीस यांचा दावा.
विधानसभा निवडणूकीचे निकाल धक्कादायक असले तरीही राजकारणी आणि राजकीय पक्षांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्यासोबतच अनेक राजकीय मंडळींची आहे. मग पहा यंदा राज्यात तुमच्या मतदारसंघातून नेतृत्त्व करणारी व्यक्ती कोण आणि कोणत्या पक्षाची आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल आणि विजयी उमेदवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर दिवशी जाहीर करण्यात आला आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 दिवशी संपणार आहे.