सातारा 4.8 रिश्टल स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Representational Image |(Photo Credits PTI)

Satara Earthquake Tremors: महाराष्ट्रातील सातारा (Satara) शहराला आज (20 जून) दिवशी सकाळी भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 7.48 मिनिटांनी नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंपाचा धक्का 4.8 रिश्टल स्केलचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये झालेल्या भूकंपात सुरक्षित राहण्यासाठी बाहेर पडणार्‍या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची  दुर्देवी घटना समोर आली होती.

ANI Tweet 

भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने जीवित अथवा वित्त हानी झाल्याची शक्यता कमी आहे. मात्र अद्यापही त्याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाईल.