Maharashtra: राज्यात कठोर लॉकडाउन लागू करा अन्यथा पूर्णपणे सूट द्या, राजेश टोपे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती
मात्र तरीही काही ठिकाणी लॉकडाउन संदर्भात शिथीलता आणत काही गोष्टी गाइडलाइन्सनुसार सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाउन संदर्भात एक मोठी विनंती केली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम आहे. मात्र तरीही काही ठिकाणी लॉकडाउन संदर्भात शिथीलता आणत काही गोष्टी गाइडलाइन्सनुसार सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाउन संदर्भात एक मोठी विनंती केली आहे. राजेश टोपे यांनी असे म्हटले आहे की, राज्यात कठोर लॉकडाउन लागू करा अन्यथा पूर्णपणे सूट द्यावी.(Mumbai COVID19 Cases Update: मुंबईत कोरोनाचे आणखी 504 रुग्ण आढळले असून 13 जणांचा आज बळी गेल्याची BMC ची माहिती)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. अशातच आता शाळा सुद्धा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. पण सध्या पूर्णत: शिथीलता दिली नसल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. ऐवढेच नव्हे तर थिएटर्स, नाट्यगृगहे अद्याप बंदच आहेत. यामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. मात्र आता राज्यातील लॉकडाउन उठवण्याबद्दल मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत तेथे निर्बंध लागू करावेत. परंतु जेथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे तेथे व्यापारासाठी पूर्णपणे परवानगी दिली जावी असे ही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. यावर आता उद्धव ठाकरे अभ्यास करुन आपला निर्णय लवकरच जाहीर करती असे ही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
तर महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8296 रुग्ण आढळले असून 6026 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 179 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात सध्या 61,49,264 रुग्ण असून आतापर्यंत एकूण 1,25,528 रुग्णांचा बळी गेला आहे. त्याचसोबत एकूण 59,06,466 जणांची प्रकृती सुधारली असून सध्या 1,14,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.