Maharashtra Diwali Bumper Lottery Results 2022: महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी निकाल आज होणार जाहीर
अवघ्या 5 अंकांवर ही महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी जिंकता येणार आहे.
दिवाळी मध्ये लक्ष्मी माता आणि कुबेराचं पूजन करताना अनेकजण घरात सुख, शांती आणि आर्थिक सुबकता नांदू दे! यासाठी प्रार्थना करतात. या प्रार्थनेसोबतच अनेकजण लॉटरीचं तिकीट काढून आपलं नशीब देखील आजमवतात. महाराष्ट्रामध्ये काही लॉटरी या मान्यताप्राप्त आहेत आणि त्या सरकार कडूनच जाहीर केल्या जातात. दिवाळी निमित्त महाराष्ट्र सरकार कडून महाराष्ट्र राज्य लॉटरी कडून 'महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी' (Maharashtra Diwali Bumper Lottery Results) जाहीर करण्यात आली आहे. यंदा या लॉटरीचा निकाल आज (5 नोव्हेंबर) दिवशी लागणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून तुम्ही 'महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी' चा निकाल पाहू शकता. अवघ्या 5 अंकांवर ही लॉटरी जिंकता येणार आहे.
दरम्यान 'महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी' चं तिकीट 200 रूपये होतं. यामध्ये पहिलं सामायिक बक्षिस 1 करोड रूपयांचं असणार आहे. दुसरं बक्षिस 5 लाख रूपयांचं असणार आहे. ज्यामध्ये 5 लाखांची 5 बक्षिसं जाहीर केली जाणार आहेत. तर तिसरं बक्षीस 5 लाखांचं आहे. हे एकच बक्षीस जाहीर केले जाणार आहे. सामान्यपणे महाराष्ट्र राज्य लॉटरी चे निकाल हे त्यांची अधिकृत वेबसाईट lottery.maharashtra.gov.in वर जाहीर केले जातात. सोबतच काही वृत्तपत्रांमध्ये हे निकाल पाहता येऊ शकतात. या वेबसाईट बक्षीसाची रक्कम कशी घ्यावी त्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रं याची माहिती दिलेली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य लॉटरी च्या वेबसाईट वरील माहितीनुसार, 10 हजार रूपयांपर्यंतचे बक्षीस तुम्ही ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेऊ शकता, तर रु 10 हजार पेक्षा जास्त रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक, लॉटरी शिवडी यांच्याकडे करावी लागते. सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे.