Maharashtra Covid-19 Restrictions: पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांत आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु; जाणून घ्या काय असतील राज्यातील निर्बंध

मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल

Lockdown | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची (Coronavirus) परिस्थिती, लॉकडाऊन (Lockdown), निर्बंध, सरकार करत असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबतचे निर्बंध 15 जूनपर्यंत वाढवण्यात आले असल्याचे सांगितले. शहरामधील रुग्णसंख्या कमी होत असून, ग्रामीण भागामध्ये ती किंचित वाढत असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील विविध पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून, 15 जून सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

दरम्यान, दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.