Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा आलेख वाढता; दिवसभरात 1410 जण COVID-19 संक्रमित

राज्यात आज (24 डिसेंबर) दिवसभरात 1410 नव्या कोरोना संक्रमितांची भर पडली आहे. तर उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 868 इतकी आहे.

coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा आलेख (Maharashtra Corona Update) पुन्हा वाढताना दिसतो आहे. राज्यात आज (24 डिसेंबर) दिवसभरात 1410 नव्या कोरोना संक्रमितांची भर पडली आहे. तर उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 868 इतकी आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने कमी होत होती. मात्र, पाठिमागील काहीदिवसांपासून ही रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडूनही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे राज्यात आजपासून रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.

दरम्यान, राज्यात नाताळ आणि नववर्षाचा उत्साह यांमुळे राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ओमायक्रोन व्हेरीएंटमुळेही महाराष्ट्रात चिंता वाढली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ओमायक्रोन रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आजवर 65 लाख 1 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ओमायक्रॉनबाधित 20 रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत 108 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 54 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. (हेही वाचा, Night Curfew In Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू; Omicron च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सावधगिरीचे पाऊल)

जिल्हानिहाय कोरोना रुग्णसंख्या

मुंबई – 46, पिंपरी-चिंचवड – 19, पुणे ग्रामीण – 15, पुणे शहर – 7, सातारा – 5, उस्मानाबाद – 5

कल्याण-डोंबिवली – 2, बुलडाणा – 1, नागपूर – 2,लातूर – 1, वसई-विरार – 1, नवी मुंबई – 1, ठाणे – 1, मीरा-भाईंदर – 1, अहमदनगर – 1

ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात आज (24 डिसेंबर) रात्रीपासून राज्य सरकारने जमावबंदी (Curfew In Maharashtra) लागू केली आहे. ही जमावबंदी रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत असणार आहे. राज्य सरकारने जारी केलेला जमावबंदी निर्णय आणि नियमावली याबाबत राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात माहिती दिली. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातच याबाबत माहिती देण्यात आली. अनिल परब यांनी सभागृहात वाचून दाखवलेल्या नियमावलीनुसार सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना बंदिस्थ सभागृहात केवळ 100 लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल. तसेच, लग्नसमारंभी आणि इतर कार्यक्रमास केवळ 50 टक्के उपस्थितीस परवानगी आहे.