Ravi Rana, Navneet Rana मातोश्री वर हनुमान चालिसा पठणावर ठाम; शिवसैनिक गुंडागर्दी करत असल्याचा रवी राणा यांचा आरोप

तेव्हापासूनच मातोश्री जवळ शिवसैनिकांनी जमायला सुरूवात केली आहे.

Ravi Rana and Navneet Rana

अमरावती च्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करणार असं आव्हान दिल्यानंतर मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.आज (23 एप्रिल) दिवशी सकाळी 9 वाजता राणा दांम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालिसा येणार होते. पण तेव्हा शिवसैनिक आक्रमक होत राणांच्या मुंबईतील घराखाली जमा झाल्यानंतर राणांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये रवी राणा यांनी आता शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे राहिलेले नाहीत. जर बाळासाहेब असते तर आमचं स्वागत झालं असतं पण सध्या शिवसैनिक गुंडागर्दी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आमच्यावर हल्ला करण्याचे निर्देश दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. मात्र अशा परिस्थितिमध्येही रवी राणा आणि नवनीत राणा मातोश्रीवर जाण्यासाठी ठाम आहेत.

दरम्यान रवी राणा यांनी आम्ही मातोश्री वर जाऊन हनुमान चालिसा पठण करणारच आणि जर आम्हांला काय झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असेल असे म्हटलं आहे. तसेच मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात आहे असेही ते म्हणाले आहेत.  मुंबई पोलिसांनी कालच राणा दांम्पत्याला एक प्रतिबंधात्मक नोटीस बजावत मातोश्री वर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. Shiv Sena: 'मातोश्री' समोर या, शिवसैनिकांकडून महा'प्रसाद' घेऊन जा; युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा राणा दाम्पत्यास इशारा .

रवी राणा यांचं आवाहन

रवी राणा आणि नवनीत राणा काल अमरावती मधून मुंबईत दाखल झाले आहेत. तेव्हापासूनच मातोश्री जवळ शिवसैनिकांनी जमायला सुरूवात केली आहे. अनेक नेते, कार्यकर्ते मागील 24 तासांपासून मातोश्री बाहेर रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. मुंबईत शिवसैनिक आक्रमक  दिसत आहेत. राणा यांच्या निवासस्थानी घोषणाबाजी केली जात आहे.