Maharashtra Civil Services Rules 1981: महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf डाऊनलोड करा सोप्या पद्धतीने

महाराष्ट्र नागरी सेवा 1981 pdf (Maharashtra Civil Services Rules 1981 pdf Download) रुपातही उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ही माहिती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपणही ही पीडीएफ येथे पाहू शकता. इथे उपलब्ध करुन दिलेली पीडीएफ ही 30 डिसेंबर 2021 पर्यंतची सुधारीत अवृत्ती आहे.

Government of Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Nagari Seva Niyam 1981: सरकारी कर्मचारी असो की सर्वसामान्य नागरिक. त्याला महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याबाबत जाणून घ्यायला आवडते किंबहून अशी माहिती आपल्याला असायला हवी असे मनोमन वाटते. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो ही नेमकी माहिती मिळेल तरी कोठे. मग एकच पर्याय समोर येतो. महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) हे पुस्तक. पण तुम्हाला माहिती आहे का, आता महाराष्ट्र नागरी सेवा 1981 pdf (Maharashtra Civil Services Rules 1981 pdf Download) रुपातही उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ही माहिती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपणही ही पीडीएफ येथे पाहू शकता. इथे उपलब्ध करुन दिलेली पीडीएफ ही 30 डिसेंबर 2021 पर्यंतची सुधारीत अवृत्ती आहे. त्यामुळे आपण ती वाचताना किंवा अद्यावत माहिती मिळवताना सरकारने 2021 नंतर काही सुधारणा केली असेल तर त्याची नोंद या पीडीएफमध्ये मिळणे काहीसे कठीण आहे.

राज्याच्या वित्त विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्याचे नाव आहे, 'महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1981'. महाराष्ट्र शासनाचे हे वित्तीय प्रकाशन क्रमांक तीन आहे. जे 30 डिसेंबर 2021 पर्यंत सुधारीत आहे आणि ते शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई द्वारा प्रसिद्ध करण्यात आले आहे. पीडिएफवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्याची किंमत 276 रुपये इतकी आहे. अर्थात सुधारीत किंमतीनुसार त्यात बदल संभवतो. येथे क्लिक करुन आपण Maharashtra Civil Services Rules 1981 pdf डाऊनलोड करु शकता. (हेही वाचा, Maharashtra Bhumi Abhilekh 7/12 Utara Online: ऑनलाईन सातबारा उतारा कसा पाहाल? घ्या जाणून)

शासनाचे तत्कालीन उप सचिव विनायक अ. धोत्रे यांनी पुस्तकाच्या (पीडिएफ) प्रस्तावनेत संक्षिप्त रुपात दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ प्रथम इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाले. त्यावेळी सदरहू नियमांचा मराठी अनुवाद स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ याचा मराठी अनुवाद १९८५ साली प्रकाशित करण्यात आला होता.महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ च्या इंग्रजी प्रकाशनात, दिनांक ३१ डिसेंबर,१९८४ पर्यंत ज्या काही सुधारणा करण्यात आल्या होत्या, त्यांचा मराठी अनुवादात अंतर्भाव करून हे प्रकाशन अद्ययावत करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २८ मार्च, १९८५ च्या राजपत्रात हा अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर या नियमांमध्ये वेळोवेळी ज्या सुधारणा करण्यात आल्या, त्या सर्व सुधारणांसह अद्ययावत प्रकाशनाची आवश्यकता असल्याने वित्त विभागाने आतापर्यंतच्या सुधारणांसह या नियमांची अद्ययावत आवृत्ती प्रकाशित करावयाचे ठरविले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now