Coronavirus Lockdown मुळे मुंबई मध्ये उपचारासाठी आलेले कॅन्सरग्रस्त रुग्ण अडकले; 200 रुग्णांना रस्त्याचा आसरा

आपल्या नातेवाईंकासह कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी हे रुग्ण मुंबईत आले होते.

Cancer patients from different states stranded (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर भारत देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सेवा ठप्प आहेत. त्यामुळे देशातील विविध राज्यातून मुंबईत आलेल्यांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई (Mumbai) मध्ये उपचारासाठी आलेले कॅन्सर रुग्णांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या नातेवाईंकासह कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी हे रुग्ण मुंबईत आले होते. त्यापैकी रजिथ नावाच्या रुग्णाने सांगितले की तो झारखंडचा असून त्यांनी परतण्यासाठी 23 मार्चचे तिकीट बुक केले होते. मात्र त्यापूर्वीच सर्व वाहतूक बंद करण्यात आली. तसंच आम्ही 200 लोक येथे अडकून पडलो आहे. आम्हाला येथे भाड्याने राहणे परवडण्यासारखे नाही आणि वाहतूक सेवा बंद असल्याने घरी जाता येत नाही. म्हणून आम्ही रस्त्यावर राहत आहोत. काही स्थानिक लोकांनी आमच्या जेवणाची सोय केली, अशी माहितीही रजिथ यांनी दिली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अनेक उद्योगधंदे, कारखाने, व्यवसाय यावर झाला आहे. त्याचबरोबर रोजंदारी कामगार, मजूर यांना लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसला आहे. Coronavirus Lockdown मुळे बेरोजगार कामगारांची घराच्या दिशेने धाव; घर गाठण्यासाठी कुटुंबासह पायपीट (Watch Video)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. कामानिमित्त मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये आलेले मजूर बेरोजगार झाले असून त्यांची परतीची वाटही बंद झाली आहे. त्यामुळे अनेकजण पायी चालत गावी आपल्या घरी निघाले आहेत. तर काहीजण जीवघेणा प्रवास करुन घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.