Maharashtra Budget 2020: इथे पहा महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 ABP Majha, TV9 Marathi वर लाईव्ह

अजित पवार (Photo Credits: PTI)

Maharashtra Budget Session 2020:  महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2020-21 आज 11 वाजता विधिमंडळामध्ये सादर केला जाणार आहे. दरम्यान काल (5 मार्च) विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये महाराष्ट्र राज्याची पिछेहाट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान राज्याची महसुली तूट 20 हजार 293 कोटींनी वाढली आहे.मागील वर्षभरात राज्यावरील कर्जदेखील वाढलं आहे. महाराष्ट्र राज्यावर एकूण 4 लाख 71 हजार 642 कोटींचं कर्ज आहे. यामध्ये मागील वर्षी सुमारे 57 हजार कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सादर होणार्‍या अर्थसंकल्पाकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. आज विधानभवनामध्ये 11 वाजता अर्थसंकल्पाच्या वचनाला सुरूवात होईल. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पाचं लाईव्ह स्ट्रिमिंग दूरदर्शन सह्याद्री प्रमाणेच एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी, झी 24 तास सह इतर प्रादेशिक भाषांमध्येही दाखवले जाणार आहेत. त्यामुळे 11 वाजल्या पासून तुम्हांला त्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. दरडोई उत्पन्नात घसरण झाल्याने महाराष्ट्र पाचव्या स्थानावर, आर्थिक सर्वेक्षणातून उघड

महाराष्ट्र अर्थसंकल्प एबीपी माझा वर पाहण्यासाठी

महाराष्ट्र अर्थ संकल्प टीव्ही 9 मराठी वर पाहण्यासाठी

दरम्यान महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाचे वाचन विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून केले जाईल तर विधानपरिषदेमध्ये अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून केले जाणार आहे. शेतकर्‍यांना यापूर्वीच सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार 2 लाखांपर्यतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली होती. आता यामध्ये वाढ केली जात आहे का? महिला सुरक्षा राज्यात कडक करण्यासाठी दिशा कायदा लागू होणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.