Maharashtra Board SSC Results 2019: दहावीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर,गुणांच्या आकडेवारीत लातूर मधील 16 विद्यार्थ्यांची 100 टक्के कामगिरी
गुणांच्या आकडेवारीत लातूरकर विद्यार्थी सध्या अग्रेसर दिसत आहेत. लातूर विभागातील तब्बल 16 विद्यार्थ्यांना यंदाच्या बोर्डाच्या निकालात 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत
मागील काही दिवसांपासून ज्या दिवसाची पालक आणि विद्यार्थी वाट पाहत होते तो दिवस आज अखेरीस उजाडला हे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर काही वेळेपूर्वीच जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 77.10% इतका लागला आहे. यंदा निकालाचा टक्का काहीसा घसरला असला तरीही मुलींनी घवघवीत यश प्राप्त करत यंदाही बाजी मारली आहे. यामध्ये लातूरकर विद्यार्थी सध्या अग्रेसर दिसत आहेत. लातूर विभागातील तब्बल 16 विद्यार्थ्यांना यंदाच्या बोर्डाच्या निकालात 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार औरंगाबाद मधील तीन तर अमरावतीमधील एका विद्यार्थीनीचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय राज्यातील एकूण 20 टक्के विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. लातूरकर विद्यार्थ्यांच्या या कामगिरीनंतर देखील लातूर बोर्डाचा एकूण निकाल मात्र तितकासा समाधानकारक दिसत नाहीये. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के इतका लागला असून लातूर विभागाचा निकाल मात्र 72.87 टक्के इतका लागला आहे.(मुंबई, पुणे, नाशिक इत्यादी विभागांचा निकाल येथे पहा)
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स:
निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स:
# महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
# Latest Notification section खालील MAH SSC 2019 Result या लिंकवर क्लिक करा.
# रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.
# त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.
# निकाल स्क्रिनवर दिसेल.
# तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.
SMS च्या माध्यमातून निकाल कसा पहाल?
एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी MHSSCand लिहून हा शॉर्टकोड 57766 वर पाठवा. (महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; अॅडमिशन मध्ये आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी तयार ठेवा 'ही' सरकारी कागदपत्रं!)
यंदा दहावीच्या परीक्षेत 16 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाही दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 82.82% लागला आहे तर मुलांचा निकाल 72.18% लागला आहे.