Maharashtra Board SSC Exam 2020: जळगावमध्ये 10 वीचा मराठी विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅप वर व्हायरल?
दरम्यान पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा (Marathi Paper) पेपर जळगाव येथे फुटल्याची गोष्ट समोर आली आहे.
MSBSHSE SSC Exam 2020: महाराष्ट्रामध्ये आजपासून एसएससी परीक्षेला (SSC Exam) सुरूवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा (Marathi Paper) पेपर जळगाव येथे फुटल्याची गोष्ट समोर आली आहे. दरम्यान हा पेपर व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) व्हायरल झाल्याची माहिती समोर आल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिलं आहे. हा प्रकार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा (Kurha-kakoda) येथे घडला आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये मराठीचा पेपर होता. 11 वाजता मराठीचा पेपर होता. पण त्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाल्याची माहिती मिळाली आहे. आजपासून राज्यात 10 वी च्या परीक्षेला सुरुवात; 4979 परीक्षा केंद्र सज्ज.
मराठीचा पेपर फुटल्याची ही घटना कुऱ्हाकाकोडा येथील शिवाजी हायस्कुल मधील आहे. काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार केल्याची चर्चा आहे. परीक्षा केंद्राबाहेर एक तरुण व्हॉट्सअॅप वर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरं परीक्षा केंद्राबाहेर शोधत होता. त्यानंतर या प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र टाईम्स सोबत शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या बातचीती दरम्यान या प्रकाराबाबत सखोल चौकशी करून केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल केला जाईल असं म्हटलं आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च दरम्यान पार पडणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण मंडळाने एसएससी परीक्षांदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. सोबतच हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.