Maharashtra Board 10th Result 2019 Date: येत्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर लागण्याची शक्यता
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही दहावीच्या निकालाचे वेध लागले आहेत.
Maharashtra Board SSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही दहावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. येत्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. 6 जून रोजी दहावीचा निकाल लागणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑनलाईन mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर चेक करु शकता. तसंच विद्यार्थी खालील या तीन वेबसाईटवरही निकाल पाहू शकतात. (अॅडमिशन मध्ये आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी तयार ठेवा 'ही' सरकारी कागदपत्रं!)
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट्स:
राज्यात यंदा 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 4 हजार 874 परीक्षा केंद्रांवर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा पार पडली. गेल्या वर्षी 8 जून रोजी दहावीचा निकाल लागला होता.