Maharashtra Board SSC Exam 2020 Timetable: 10 वीची परीक्षा 3 मार्च पासून सुरू होणार, PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक, mahahsscboard.maharashtra.gov.in वर अधिक माहिती

दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाने परीक्षांची तारीख जाहीर केली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीचच्या मुख्य परीक्षेला 3 मार्च 2020 रोजी सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांतर्गत या परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाने परीक्षांची तारीख जाहीर केली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsscboard.in वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर आजपासून दहावीचे वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळेला दहावीच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाने सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवर माध्यातून जाहीर झालेल्या वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असे अहवान देखील केले होते. हे देखील वाचा- Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक

दहावी परीक्षा 2020चं वेळापत्रक पीडीएफ  स्वरूपात पाहण्या आणि डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. दरम्यान, दहावीचे विद्यार्थी बदलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणार आहे. तर पुन्हा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित जुने वेळापत्रक वेगळे जाहीर करण्यात आले आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना शाळेकडूनच दिले जाणार आहे. यंदा 17 लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत.