Maharashtra Board Class 10, 12 Results 2020: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार? जुलै अखेर लागणार दहावीचा निकाल
त्यामुळे यावर्षी दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत.
लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यावर्षी दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आज सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या बारावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHE) बारावीचा निकाल 14 जुलै किंवा 15 जुलै रोजी जाहीर केला जाऊ शकतो. तर, दहावीचा निकाल लागणार जुलै महिन्याच्या अखेर लागण्याची शक्यता आहे. मात्र, एमएसबीएसएचईने महाराष्ट्र निकाल 2020 ची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. लॉकडाऊनमुळे पेपरतपासणीचे काम सुरु व्हायला मे महिना उजाडला आहे. आम्ही मूल्यांकन प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बारावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एफवायजेसी प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर अकरावीचे वर्ष सुरू होईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. हे देखील वाचा- हे देखील वाचा- ICSE, ISE Results 2019: आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल cisco.org वर जाहीर
महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागला होता. मात्र, यावर्षी महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे दहावी, बारावीच्या निकालाला उशीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परिक्षेसाठी 13 लाख तर, दहावीच्या परिक्षेसाठी 17 लाख विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी दहावीची परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टी वेळेत पार पडल्या होत्या. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 8 जून 2019 रोजी जाही जाहीर झाला होता. तर, बारावीचा निकाल 28 मे रोजी लागला होता. मात्र, यंदा ही तारीख केव्हाच उलटून गेली असून अद्यापही निकाल जाहीर झाला नाही.