Maharashtra ATS: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; औरंगाबाद, पुणे, कोहलापूर, बीड, परभणीसह राज्यभरातून अनेकांना अटक

गुरुवारी (22 सप्टेंबर) पाहाटे कलेल्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद (Aurangabad), पुणे (Pune), कोल्हापूर (Kohlapur), बीड (Beed), परभणी (Parbhani), नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) राज्यभरात मोठी कारवाई सुरु केली आहे. गुरुवारी (22 सप्टेंबर) पाहाटे कलेल्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद (Aurangabad), पुणे (Pune), कोल्हापूर (Kohlapur), बीड (Beed), परभणी (Parbhani), नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. या कारवाईत काही जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसची कारवाई अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आणखीही काही जणांना अटक करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विविध समुदायांमध्ये वैर वाढवण्याच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये आणि राज्याविरुद्ध उठाव करण्याचा कट रचल्याबद्दल आयपीसी आणि यूएपीएच्या विविध कलमांद्वारे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे, असे एटीएस महाराष्ट्रने म्हटले आहे. (हेही वाचा, NIA, ED Raid PFI Offices: एनआयए, ईडीचे पीएआय कार्यालये आणि संबंधित ठिकाणांवर छापे; 100 पेक्षा अधिक जणांना अटक झाल्याचे वृत्त)

दरम्यान, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) 10 राज्यांमध्ये दहशतवादाचे समर्थन केल्याबद्दल अनेक संशयास्पद गट, प्रामुख्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात, तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्यांच्या ठिकाणांवर छापे (NIA, ED Raid PFI Offices) टाकले जात आहेत. एनआयएची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई म्हणून ओळखली जात आहे. या कारवाईत 100 जणांन आतापर्यंत अटक झाल्याचे समजते. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्विट

एएनआने इतरही काही केंद्रीय तपास यंणांच्या सहाय्याने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. यात ईडीचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या सहाय्याने एएनआयने पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक नेतृत्वाच्या घरांवर छापे टाकले आहेत असे, अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. छाप्यांवर प्रतिक्रिया देताना, पीएफआयने सांगितले की "फॅसिस्ट राजवटीने" त्याच्या विरोधात असहमत असलेल्यांना शांत करण्यासाठी एजन्सींचा वापर केला होता. आजही तेच सुरु आहे.