Nana Patole Tests Covid Negative: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनामुक्त; पुढील काही दिवस होम क्वारंटीन राहणार
तेव्हा पासून ते होम क्वारंटीन होते. मात्र उपचाराने त्यांनी घरीच राहून कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ( Maharashtra Assembly Speaker) नाना पटोले (Nana Patole) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान नाना पटोले यांनी ट्वीटर वर रिपोर्ट शेअर करत कोरोनामुक्त झाल्याची बातमी शेअर केली आहे. दरम्यान 4 सप्टेंबर दिवशी नाना पटोले यांचा कोविड 19 चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा पासून ते होम क्वारंटीन होते. मात्र उपचाराने त्यांनी घरीच राहून कोरोनावर मात केली आहे. पुढील अजून काही दिवस नाना पटोले होम क्वारंटीनच राहणार आहे. तसा डॉक्टरांचा सल्ला आहे असे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांचे या काळात वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनापूर्वी 2 दिवस विधानसभा अध्यक्षांचाच कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यात अधिवेशन होणार की नाही? असा काहींना प्रश्न पडला होता मात्र सार्यांच्याच कोरोना चाचण्या करून अवघ्या दोन दिवसांचं पावसाळी अधिवेधन पार पडले आहे. आता हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2020 मध्ये नागपूरात आयोजित करण्यात आलं आहे. Shripad Naik Health Update: केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक महिन्याभराच्या उपचारानंतर कोरोनामुक्त; पणजीच्या हॉस्पिटल मधून सुट्टी.
नाना पटोले यांचं ट्वीट
नाना पटोले मागील महिन्यात विदर्भामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. 'विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली.' असं ट्वीट करत काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती.
नाना पटोले हे कॉंग्रेसचे साकोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. दरम्यान ते सध्या विधानसभेचे अध्यक्ष देखील आहे.
यंदाच्या विधानसभा अधिवेशनानंतर कॉंग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर छगन भुजबळ हे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याने होम क्वारंटीन आहेत.