Maharashtra New Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात जोरदार दावेदारी; जाणून घ्या प्रमुख चेहरे
अव्वल दावेदार कोण? घ्या जाणून
CM Post Battle In Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) साठी मतदान तर झाले. आता वेध लागले आहेत, उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीचे. या मतमोजणीनंतर कोणाला सत्ता द्यावी? या जनतेच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. निकालासाठी काऊंटडाऊन सुरु झाले असून, अवघे काहीच तास शिल्लख असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यात मुख्यमंत्री कोण होणार (Who Will Be Maharashtra Chief Minister?) आणि सत्ता कोण स्थापन करणार याबाबत चर्चाचर्वण सुरु आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांची नावे पुढे केली जात आहेत. त्यामुळे उघड कोणीच बोलत नसले तरी मतमोजणी होण्यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महा विकास आघाडी (MVA) या दोघांमध्ये पुढील सरकारचे नेतृत्व कोण करणार याबाबत मतभेद निर्माण झाले आहेत, असे वृत्त आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
महाविकासआघाडी आणि महायुतीमध्ये नेतृत्वाची चर्चा
महाविकासआघाडी: या घाडीमध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षाचा समावेश आहे.
महायूती: या आघाडीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर त्याखालोखाल शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे घटक पक्ष आहेत. (हेही वाचा, Uttamrao Jankar On Ajit Pawar: अजित पवार बारामतीत 40 हजार मतांनी पराभूत होतील; निकालापूर्वी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांचा दावा)
मुख्यमंत्री पदावरुन दावेदारी
महाविकासआघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन तिन्ही पक्षांमध्ये दावेदारी आहे. काँग्रेसला आपण लोकसभेप्रमाणेच अधिक जागा जिंकू असे वाटत असल्याने मुख्यमंत्री पदासाठी अनेक इच्छुक आहेत. तर, शिवसेना (UBT) पक्षाकडून महत्त्वाचे नेते संजय राऊत हे स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रमोट करत आले आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही पत्ता खोलत नसला तरी, ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री असे म्हणत शरद पवार यांनी आगोदरच एक डाव टाकला आहे. शिवाय, या पक्षातून जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे अधिक चर्चेत आहेत. (हेही वाचा -Exit Poll Results 2024 For Maharashtra: महायुती चं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार; एक्झिट पोल्सचे अंदाज)
महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. 105 आमदार असतानाही आगोदरच त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. त्यामुळे आता काही झाले तरी भाजपला मुख्यमंत्री पद घ्यायचेच असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक जोरदार लॉबींग करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (शिंद गट) पक्षातील शंभुराजे देसाई, संजय शिरसाट यांसारखी मंडळी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असे म्हणत आहे. तर अजित पवार हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असे थेट बॅनरच राष्ट्रवादी काँग्रेस (AP) कार्यकर्त्यांनी झळकावले आहेत.
एक्झिट पोल आणि आरोप
दरम्यान, मतदानानंतर काहीच वेळात जाहीर झालेल्या एक्झीट पोल्सनी आपले अंदाज वर्तवले आहेत. ज्यामध्ये महायुतीला मोठे यश मिळत असल्याचे दाखवले आहे. अपवादात्मक स्थितीत काही पोल्सनी महाविकासआघाडी सत्तेत येईल असे भाकीत केले आहे. दरम्यान, महायुती आणि महाविकासआघाडी अशा दोन्ही बाजूंनी आपल्या विरोधात कल नोंदविलेल्या पोल्सचे अंदाज फेटाळून लावले आहेत. या पोल्समध्ये अनेक त्रुटी असल्याचेही दोन्ही बाजूंनी म्हटले आहे.