Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक लढवावी की नाही? मनसे पेचात
राज यांचे निवास्थान कृष्णकूंज येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत मनसेच्या काही नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा विचार बोलून दाखवला. तर काहींनी विद्यमान राजकीय स्थिती निवडणूक लढवणं योग्य ठरणार नाही, अशी मतं व्यक्त केली.
Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नेत्यांमध्ये दुमत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. राज यांचे निवास्थान कृष्णकूंज येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत मनसेच्या काही नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा विचार बोलून दाखवला. तर काहींनी विद्यमान राजकीय स्थिती निवडणूक लढवणं योग्य ठरणार नाही, अशी मतं व्यक्त केली.
या बैठकीनंतर मनसे नेत बाळा नांदगावरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांची मतं जाणून घेतली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. तर, काही पदाधिकाऱ्यांनी विद्यमान स्थिती निवडणुका लढविण्यासाठी पोषक नसल्याचे मत व्यक्त केले. निवडणुकासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय पक्षाने घेतला नाही. मात्र, लवकरच त्याबाबत विचार नक्की केला जाईल, असेही बाळा नांदगावरकर म्हणाले.
विधानसभा निवडणूक 2014 मध्ये मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर हा पक्ष जवळपास राजकीय विजनवासात गेला. लोकसभा निवडणूक 2014 मध्येही या पक्षाला अपयश आले. त्यानंतर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये या पक्षाने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. (हेही वाचा, Raj Thackeray ED Enquiry: राज ठाकरे यांना धाडलेल्या ईडी नोटीशीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया; 'बहु भी कभी सास बनती है')
दरम्यान, गेल्या काही काळात राज ठाकरे यांनी इव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यात येऊ नयेत याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यासाठी ते दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाची भेटही घेऊन आले होते. तसेच, त्यांनी काँग्रेस पक्ष हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या या भूमिकेवरु सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकार नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानंतर काही काळात त्यांना कोहीनुसर प्रकरणी अंमलबजावनी संचालनालयाची नोटीस आली आणि त्यांची चौकशीही झाली. अद्यापही या चौकशीचा ससेमीर त्यांच्या पाठी आहेच.