पहा प्राथमिक निकालानुसार कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर; अनेक ठिकाणच्या हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचे लक्ष

महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे? राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. या दरम्यान पाहूया राज्यात सध्या कोण आहे आघाडीवर तर कोणता पक्ष आहे पिछाडीवर.

Maharashtra Assembly Election Result 2019 (File Image)

Maharashtra Assembly Election Result 2019: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा (Maharashtra Assembly Election Result) प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीच्या निकालाचा प्राथमिक कल भाजपकडे असलेला दिसून येत आहे. मात्र आघाडीनेही अनेक ठिकाणी आपले स्थान बळकट करत युतीसाठी फार मोठे आव्हान उभे केले आहे. सध्या राज्यात अनेक हायव्होल्टेज लढती पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या निकालाची जनतेला प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे? राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. या दरम्यान पाहूया राज्यात सध्या कोण आहे आघाडीवर तर कोणता पक्ष आहे पिछाडीवर.

विधानसभा निवडणुकीचा प्राथमिक कल - 

महायुती – 180

महाआघाडी - 92

भाजप – 109

शिवसेना – 71

राष्ट्रवादी – 54

कॉंग्रेस – 38

मनसे – 3

वंचित – 0

इतर - 13

सध्या काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे ती परळी येथे. परळी येथे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यामध्ये अवघ्या काही मतांनी धनंजय आघाडीवर असलेले दिसून येत आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांना धक्का बसला आहे, कारण सध्या श्रीनिवास पाटील यांची आघाडी आहे. सोलापूरमधील तिरंगी लढतीमध्ये प्रणिती शिंदे पिछाडीवर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नागपूर येथून देवेंद्र फडणवीस हे पिछाडीवर होते मात्र पुन्हा मुसळी मारत त्यांनी 5 हजार मातांची आघाडी घेतली आहे. मुक्ताईनगर येथे रोहिणी खडसे 4 त्या फेरीतही पिछाडीवर आहेत. कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे सध्या आघाडीवर आहेत. काळवा मुंब्रा येथून सध्या दीपाली सय्यद पिछाडीवर आहेत.

महाराष्ट्राला उत्सुकता आहे ती पक्षांतर झालेल्या उमेदवारांची. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिगज्जांनी पक्षांतर केले होते, नवीन पक्षांनी मोठ्या विश्वासाने त्यांना तिकीटही दिले. आता या उमेदवारांना नवीन पक्ष तारेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.