Maharashtra Assembly Election 2024: माहिम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे पिछाडीवर; महेश सावंत यांची आघाडी

मात्र, आता ते पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे.

Amit Thackeray | (Image source: Instagram)

Maharashtra Assembly Election 2024: यंदा माहीम विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का देखील चांगला पहायला मिळाला आहे. मतदारांनी चांगाल प्रतिसाद दिला आहे. 7,500 मतांनी महेश सावंत आघाडीवर आहेत. आतापर्यंत 100 जागांचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये महायुती 175, मविआ 108 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 105, शिंदे गट 41, अजितदादा गट 33, काँग्रेस 35, ठाकरे 34 आणि शरद पवार गट 35 जागांवर आघाडीवर आहेत. तर मनसेचे दोन उमेदवार पिढाडीवर असल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडीला अद्याप खाते खोलता आलेले नाही. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारही अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67 टक्के मतदान झाले होते. आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे माहीममध्ये यंदा वाढलेला हा मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif