महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा ते सोलापूर मध्य मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अशी या मतदारसंघांची नावे आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अशी या मतदारसंघांची नावे आहेत. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.
करमाळा मतदारसंघ क्रमाक- 244
विधानसभा निवडणूक 2014 साली शिवसेनेचे आमदार नारायण गोविंदराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमती रश्मी दिगंबर बागल यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली आहे. पाटील यांना 60 हजार 674 मत पडली असून या लढतीत बागल यांचा केवळ 250 मतांनी पराभव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये करमाळा मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे- रश्मी बागल (शिवसेना), दशरथ कांबळे (वंचित बहुजन आघाडी)
माढा मतदारसंघ क्रमांक- 245
माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे यांनी विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेस पक्षाचे नेते कल्याणराव काळे यांचा पराभव केला होता. बबनराव शिंदे यांना 97 हजार 803 मत मिळाली होती तर, कल्याणराव यांना 60 हजार 417 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये माढा मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे-संजय कोकाटे (शिवसेना), बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी)
बार्शी मतदारसंघ क्रमांक-246
सोलापूर येथील बार्शी मतदारसंघात प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पक्षाचा उमेदवार निवडून आले आहेत. बार्शी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. बार्शी मतदारसंघावर नजर टाकली तर 1962 सालापासून शिवसेना पक्षाने एकदाच भगवा फडकला आहे. विधानसभा निवडणूक 2014 साली राष्ट्रवादीचे दिलीप सोपल आणि शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली होती. यावेळी सोपल हे विजयी झाले होते. सोपल यांना 97 हजार 655 मत मिळाली होती, तर राजेंद्र राऊत यांना 92 हजार 544 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये बार्शी मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे- दिलीप सोपल (शिवसेना) , महादेव एकनाथ काकडे (वंचित बहुजन आघाडी), नागेश चव्हाण (मनसे)
मोहोळ मतदारसंघ क्रमांक- 247
विधानसभा निवडणूक 2014 काँग्रेस पक्षाचे आमदार रमेश नागनाथ कदम यांचा विजय झाला होता. कदम यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत 62 हजार 120 मत मिळाली होती. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय क्षीरसागर हे विरुद्ध उभे होते. कदम यांनी संजय क्षीरसागर यांचा 8 हजार 367 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मोहोळ मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे- यशवंत माने (राष्ट्रवादी), नागनाथ क्षीरसागर (शिवसेना), हनुमंत भोसले (मनसे)
सोलापूर उत्तर मतदारसंघ क्रमांक- 248
विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख यांनी सोलापूर मतदारसंघात एकहाती विजय मिळवला होता. देशमुख यांना 86 हजार 877 मत पडली असून काँग्रेस पक्षाचे महेश चंद्रकांत गादेकर यांचा 68 हजार 878 मतांनी पराभाव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे- विजय देशमुख (भाजप), आनंद चंदनशिवे (वंचित बहुजन आघाडी)
सोलापूर मध्य मतदारसंघ क्रमांक- 249
सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या प्रणिती सुशीलकुमार शिंदे या विजयाच्या हॅट्रिकवर आहेत. प्रणिती यांनी विधानसभा निवडणूक 2009, 2014 साली सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. यावेळी एमआयएम पक्षाचे उमेदवार तौफिक शेख विरुद्ध उभे होते. प्रणिती शिंदे यांना 46 हजार 907 मत मिळाली होती तर, तौफिक शेख यांना 37 हजार 138 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर मध्य मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रणिती शिंदे (काँग्रेस)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.