भाजप जाहीरनाम्यातील 'वीर सावरकर यांना भारतरत्नसाठी शिफारस' हा उल्लेख क्लेशदायक - शिवसेना

मग, पी. चिदंबरम, रॉबर्ड वढेरा वैगेरेंना स्वातंत्र्यवीर सावरकर मानायचे काय? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit-Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: 'आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करु त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात (BJP Manifesto 2019) सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे' असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मित्रपक्षाबद्दल खंत व्यक्त केली आहे. शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

याच लेखात उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत वीर सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवान्वित करायलाच हवे होते. सरकार आपलेच होते. सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारकांचे महानायक होते. पण आपल्या देशातील एक वर्ग महात्मा गांधींना खलनायक ठरवत आहे. तर, दुसरा वर्ग सावरकरांना खलनायक ठरवत आहे. हे कधीतरी तथांबायलाच हवे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणते, सावकरकारांना भआरपतरत्न देण्यासाठी प्रयत्न करु. आम्ही विचारतो, सावरकररांवर इतके वाईट दिवस आले आहेत काय, की त्यांना शिफारशीची गरज पडावी? असा सवाल उपस्थित करतानाच सावरकरांना स्वातंत्र्यवीर मानायला काँग्रेस व त्यांचे बगलबच्चे तयार नाहीत. मग, पी. चिदंबरम, रॉबर्ड वढेरा वैगेरेंना स्वातंत्र्यवीर सावरकर मानायचे काय? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. (हेही वाचा, मुंबई: वीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता: उद्धव ठाकरे)

शिवसेना आणि भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक युतीद्वारे लढत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी संयुक्त प्रचारसभा घेतल्या. परंतू विशेष असे की, दोन्ही पक्षांनी निवडणुक जाहीरनामा संयुक्तरित्या न काढता स्वतंत्र काढला आहे. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्याला वचननामा असे तर भाजपने आपल्या जाहीरनाम्यास संकल्प पत्र असे नाव दिले आहे. भाजपच्या याच संकल्प पत्रावर उद्धव ठाकरे भाष्य केले आहे.