Maharashtra: तुळजाभवानी मंदिरात बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी 11 पुजाऱ्यांवर कारवाई
Maharashtra: महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिरातील एक घटना समोर आली आहे. त्यानुसार येथील मंदिराच्या 11 पुजाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर या पुजाऱ्यांनी बेशिस्त पद्धतीने वर्तवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लागण्यात आल्याने त्यांना प्रवेश बंद केला आहे. याबद्दलचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबद्दलची कारवाई संस्थाचे अध्यक्षांकडून कारवाई करण्यात आली आहे.
मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी असतानाही प्रवेश देणे, तेथे फोटो काढणे, बेशिस्त वर्तवणूक, सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालणे, भाविकांना मंदिरात घुसवणे असे प्रकार त्यांच्याकडून केले जात होतो. त्यामुळे 11 पुजाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई केली गेली आहे. आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने आता त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे.(Balasaheb Thackeray Jayanti 2022: बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून अभिवादन)
कोरोनाच्या परिस्थितीमुळे मंदिरासह त्यासंबंधित व्यवस्थापक, कर्मचारी आणि पुजाऱ्यांसाठी सुद्धा काही नियम घालण्यात आले आहेत. मात्र पुजाऱ्यांकडून अशा प्रकारचे वर्तन करण्यात आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहेच. पण थेट प्रवेशबंदी केल्याने पुजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई करण्यात आलेल्या पुजाऱ्यांवर 1 ते 3 महिन्यांसाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.