Jitendra Navlani: जितेंद्र नवलानी यांच्यावर गुन्हा दाखल, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांची एसीबीकडून दखल

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत राज्याच्या महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Maharashtra ACB) जितेंद्र ‘जीतू’ नवलानी ( Jitendra Navlani) (72) यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करेला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: YouTube)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत राज्याच्या महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Maharashtra ACB) जितेंद्र ‘जीतू’ नवलानी ( Jitendra Navlani) (72) यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करेला आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थातच इडीच्या सांगण्यावरुन काम करत अनेक व्यवसायिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप नवलानी यांच्यावर होता. शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नवलानी यांनी तब्बल 59 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप केला होता. प्राप्त माहितीनुसार नवलानी आणि इतरांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 (अ) (लोकसेवकांना बेकायदेशीर मार्गाने प्रभावित करण्यासाठी अवाजवी फायदा घेणे) आणि 8 (लोकसेवकाला लाच देणे संबंधित गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा एसीबीने दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात म्हटले होते की, नवलानी हे ईडीच्या तीन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशिष्ट व्यवसायिकांना लक्ष्य करत होते. त्या मार्फत त्यांनी खंडणीचेही रॅकेट चावले. इडी चौकशीपासून संरक्षण देण्याच्या नावाखाली पैसे उकळत असत. या सर्व प्रकारातून त्यांनी मुंबईतील बड्या बिल्डर्सकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याचाही आरोप राऊत यांनी केला होता. नवलानी हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा सहकारी म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Shiv Sena: महाराष्ट्रात ठाकरे सरकारचाच शब्द चालेल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा)

अरविंद भोसले यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरुन मुंबई दिलेल्या लेखी तक्रारीवरुन मुबई पोलिसांनी एक चौकशी केली. त्यासाठी आयपीएसअधिकारी वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची स्थापनाही करण्यात आलीहोती. आयपीएस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भोसले यांच्याकडून नवलानी आणि इतर काही लोकांविरुद्ध एक तक्रारी आली होती. तक्रारीची दखल घेऊन आम्ही केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले की, नवलानी आणि त्यांचे काही इतर साथीदार ईडी अधिकाऱ्यांच्या वतीने काम करत असल्याचा दावा आहे तसेच काही लोकांकडून पैसेही उकळण्याचे काम झाले आहे.