पुणे: पतीकडून पत्नीवर भररस्त्यात वार, मूल होत नसल्याच्या रागातून कृत्य
ही घटना पुणे (Pune) येथील खडकी (Khadki) बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मूल होत नसल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर भरसरस्त्यात धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील खडकी (Khadki) बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिलेला मुल होत नसल्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद होत असे. याला वैतागून पत्नी आपल्या माहेरी आली होती. या नैराश्यातून आरोपीने खडकी बाजारात आलेल्या आपल्या पत्नीवर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित महिलेचे आरोपी प्रविण हंडे यांच्याशी गेल्या दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. परंतु लग्नाला दोन वर्ष झाली तरी आपल्या पत्नीला मूल होत नाही. यामुळे प्रविण त्याच्या पत्नीसह दररोज वाद घालत असे. याला वैतागून पीडित महिला आपल्या माहेरी म्हणजे पुण्याला आली होती. यातच मंगळवारी सकाळी पीडित महिला खडकी येथील बाजारात आली होती. त्यावेळी प्रविण त्या ठिकाणी आला होता. त्यावेळीही दोघांमध्ये बाचाबाची झाली. यातून प्रविण याने पीडितावर कोयत्याने वार केला. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पीडित महिलेला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ज्यामुळे पीडित महिलेचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी खडकी बाजारात धाव घेऊन प्रविणला अटक केली. हे देखील वाचा- पालघर: मुलाकडून आईची हत्या; कारण कळताच बसेल धक्का!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रविण हंडे याचे संबंधित महिलेशी विवाह झाला होता. परंतु, लग्न होऊन दोन वर्ष उलटली तरीदेखील आपल्याला मूल-बाळ नाही, यामुळे प्रविण आपल्या पत्नीशी नेहमी वाद घालत असे. या नैराश्यातूनच प्रविणने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची त्याने स्वत: सांगितले. प्रविणला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्यापकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.